“दबंग 3′ आणि “ब्रम्हास्त्र’ची टक्कर टळली

या वर्षी ख्रिसमसच्या मुहुर्तावर आलिया, रणबीर आणि अमिताभ बच्चन यांचा “ब्रम्हास्त्र’ आणि सलमान खानचा “दबंग 3’मध्ये टक्कर होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र आता ही टक्कर होण्याची शक्‍यता टळली आहे. “ब्रम्हास्त्र’च्या निर्मात्यांनी सिनेमाचा रिलीज पुढे ढकलला आहे. आता “ब्रम्हास्त्र’ 2020 च्या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये रिलीज होणार आहे.

दर्शकांना “ब्रम्हास्त्र’ बघण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे, असे या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक अवान मुखर्जी यांनी सांगितले. यापूर्वी कुंभ मेळ्यादरम्यान “ब्रम्हास्त्र’चा लोगो रिलीज केला गेला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद बघून अतिउत्साहाने निर्मात्यांनी 2019 च्या ख्रिसमसमध्ये सिनेमा रिलीज करण्याची घोषणा करून टाकली होती.

मात्र “व्हीएफएक्‍स’च्या टीमला संगीत आणि ध्वनिविषयक कामासाठी आणखी वेळ लागण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन “ब्रम्हास्त्र’चा रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. “दबंग 3′ या वर्षी 20 डिसेंबरला रिलीज होईल, असे सलमान खानने यापूर्वीच जाहीर केले आहे. कारण काहीही असले तरी एकाचवेळी दोन बिगबजेट सिनेमे रिलीज होण्याने निर्मात्यांचे संभाव्य नुकसान टाळले गेले आहे, एवढे मात्र नक्की.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.