World Cup 2023 New Zealand vs Bangladesh Match : विश्वचषकाच्या 11व्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ICC Men’s Cricket World Cup 2023
Bangladesh 🆚 New Zealand🏏New Zealand won the toss and decided to bowl first
Photo Credit: ICC/Getty#BCB | #NZvBAN | #CWC23 pic.twitter.com/8QGULkA0eg
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 13, 2023
बांगलादेश संघाचे चार फलंदाज बाद झाले आहेत. त्याची स्थिती खराब आहे. 12व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मेहदी हसन मिराज बाद झाला. मॅट हेन्रीच्या हाती त्याला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले. मेहदी हसनने 46 चेंडूत 30 धावा केल्या.
पुढच्याच षटकात बांगलादेशला आणखी एक धक्का बसला. ग्लेन फिलिप्सने नजमुल हुसेन शांतोला डेव्हन कॉनवेकरवी झेलबाद केले. त्याने आठ चेंडूंत सात धावा केल्या. बांगलादेशला चौथा धक्का बसला तेव्हा त्याच्या 13 षटकांत 57 धावा झाल्या होत्या.
सध्या मुशफिकर रहीम 33*(33) आणि शकील अल हसन 16*(29) क्रीजवर आहेत. त्यांनी बांगलादेशचा डाव सावरला असून सध्या बांगलादेशच्या 22 षटकांत 4 बाद 106 धावा झाल्या आहेत.