ICC ODI World Cup 2023 Australia vs Sri Lanka Match Result : विश्वचषक स्पर्धेतील 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर सोमवारी (१६ ऑक्टोबर) विजयासह त्याने स्पर्धेत आपले खाते उघडले. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीलंकेविरुद्धच्या विजयासह पाचवेळच्या चॅम्पियन संघाचे दोन गुण झाले.
विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा सलग तिसरा पराभव झाला. यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानने पराभव केला होता. आजच्या पराभवासह लंकन संघाने एका लाजिरवाण्या विक्रमाची बरोबरी केली. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने गमावून श्रीलंका संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने झिम्बाब्वेशी बरोबरी साधली. श्रीलंका आणि झिम्बाब्वे 42-42 सामने हरले आहेत. या बाबतीत वेस्ट इंडिज (35 पराभव) दुसऱ्या स्थानावर आहे आणि इंग्लंड (34 पराभव) तिसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान, विश्वचषक 2023 स्पर्धे च्या 14 व्या सामन्यात, पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने 1996 च्या विजेत्या श्रीलंकेचा पाच विकेट्सने पराभव केला आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेचा संघ 43.3 षटकात 209 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 35.2 षटकांत 5 गडी गमावत 215 धावा करून सामना जिंकला.
Australia won by five wickets #CWC23 #SLvAUS pic.twitter.com/RxgVUTI7NS
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 16, 2023
सध्याच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला आहे. लखनौमध्ये त्यांनी श्रीलंकेचा पाच विकेट्स राखून पराभव करून सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाला यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ सलग तिसऱ्या सामन्यात पराभूत झाला आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलियानेही पराभव केला आहे.