World Cup 2023 IND vs AUS Match Live Score : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानात सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय गोलंदाजांनी स्वस्तात गुंडाळले. ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध 49.3 षटकांत 199 धावांत गारद झाला.
दरम्यान, पहिल्या पॉवरप्लेमध्ये म्हणजे पहिल्या 10 षटकांत एक विकेट गमावून ऑस्ट्रेलियाने 43 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये (पहिली 10 षटके) गेल्या 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. या सामन्यापूर्वी, मागील 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाची सरासरी धावसंख्या 76 धावा होती.
पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाला एकमेव धक्का बसला तो मिचेल मार्शच्या रूपाने. पाच धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियन संघाची पहिली विकेट पडली. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिचेल मार्शला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. मार्शला खातेही उघडता आले नाही. जसप्रीत बुमराहने या विकेटसह एक खास विक्रम केला. विश्वचषकात भारतीय गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजाला शून्यावर बाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
BOOM! 💥
Jasprit Bumrah gets Mitchell Marsh! 🙌
Virat Kohli takes a sharp catch diving to his left 👌👌
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/gK7lg3RoYQ
— BCCI (@BCCI) October 8, 2023
तसेच, भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा 150 वा एकदिवसीय सामना आहे. कोणत्याही एका संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची ही भारताची दुसरी सर्वाधिक संख्या आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताने श्रीलंकेविरुद्ध 167 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया दुस-या स्थानावर तर वेस्ट इंडिजचा संघ 142 वनडेसह तिस-या स्थानावर आहे.