मुंबई – करोनामुळे टी-20 विश्वचषक 2021 युएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याही संघासह काल रात्री उशिरा मायदेशात परतला. मात्र, विमानतळावर पोहचल्यानंतर कस्टमने हार्दिक पांड्याची 5 कोटी किंमतीची 2 घड्याळे ताब्यात घेतली आहे. हार्दिक पांड्याकडे या घड्याळाचे इनवॉइस नव्हते. तसेच त्याने या घड्याळांची कोणतीही माहिती दिली नसल्याचे समजते.
टी-20 विश्वचषक 2021च्या स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. ज्यामुळे भारतीय संघाचे आव्हान “सुपर-12’मध्ये संपुष्टात आले. या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ काल रात्री उशीरा मायदेशात परतला. यावेळी कस्टमला हार्दिक पांड्याकडे तब्बल 5 कोटी रुपये किंमतीची 2 घड्याळे आढळली. परंतु, हार्दिककडे या घड्याळ्यांची पावती नाही. तसेच त्याने या घड्याळ्यांचा कस्टम वस्तूंमध्ये समावेशही केला नाही. ज्यामुळे कस्टमने ही दोन्ही घड्याळे ताब्यात घेतली आहे.