मुंबई – बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच पण सध्या या देशात एकच वाघ आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या (दि. 14मे) भाषणाला उत्तर देताना केले. आज रविवारी (दि. 15) गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये भाजपचे हिंदी भाषिक संकल्प संमेलन होते. यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बाबरी मशीद पाडण्यासाठी मी होतोच असा पुनर्उच्चार केला.
दरम्यान, फडणवीस यांच्या भाषणापूर्वी मंचावरील नेत्यांनी आणि सभेला उपस्थित लोकांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं. या सभेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक बडे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, रामजन्मभूमी आंदोलनात तुम्ही (शिवसैनिक) नव्हता असे म्हणालो तर मिरची लागली. उद्धवजी 1992 साली मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये वकिल झालो आणि डिसेंबरला नगरसेवक वकिल देवेंद्र फडणवीस बाबरी पडण्यासाठी गेलो होतो, याचा मला अभिमान आहे. तसेच आज माझे वजन 102 किलो आहे. बाबरीवेळी माझे वजन 128 किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही. तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडून पुन्हा सत्तेत येणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.