खराब फॉर्ममुळे अंतिम सामन्याला सीएसकेचा दिग्गज खेळाडू मुकणार?

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या अंतिम सामना आता तासांवर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी (15 ऑक्टोबर) कोलकाता नाइट राइडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हे युद्ध दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर रंगणार आहे. या अखेरच्या आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ आपली बेस्ट प्लेइंग 11 घेऊन खेळणार यात शंका नाही.

त्यामुळे चेन्नईचा दिग्गज खेळाडू सुरेश रैना जो यंदा खास फॉर्ममध्ये नसल्याने या सामन्याला तो मुकण्याची दाट शक्यता आहे. मागील काही सामने तो संघात याच कारणामुळे नसल्याचे दिसून येत आहे.

सुरेश रैना याला मिस्टर आय़पीएल म्हटलं जात. चेन्नईला तीन वेळा चॅम्पियन बनवण्यात रैनाचा मोठा हात आहे. मात्र यंदा त्याचा फॉर्म अतिशय खराब असल्याचं दिसत आहे. यंदाच्या पर्वात त्याने 12 सामन्यात 17.77 च्या सरासरीने केवळ 160 धावाच केल्या आहेत. त्यामुळे मागील तीन सामने तो संघात नसून त्याच्या जागी रॉबिन उथप्पा याला स्थान दिले जात आहे.

उथप्पाच फायनल खेळण्याची दाट शक्यता
रैनाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या उथप्पाने दिल्ली विरुद्ध क्वॉलिफायरमध्ये उत्कृष्ट अर्धशतक ठोकल्यामुळे तोच अंतिम सामन्यातही संघात असण्याची दाट शक्यता आहे. त्याने या महत्त्वाच्या सामन्यात 44 चेंडूत 63 धावा केल्या. यावेळी 2 षटकारांसह त्याने 7 चौकारही लगावले.

उद्याच्या सामन्यात चेन्नईचं पारडं जड असलं तरी केकेआरचे तीन खेळाडू चेन्नसाठी फार धोकादायक आहेत. हे त्रिकुट म्हणजे सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि शाकिब अल् हसन. या तिघा फिरकीपटूंनी आतापर्यंत आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे भारताचा युवा गोलंदाद वरुण यानेतर सर्वात बेस्ट फिरकी गोलंदाजी यंदाच्या पर्वात केली आहे. त्याच जोरावर त्याची आगामी टी20 विश्व चषकासाठीही निवड झाली आहे. तिघांच्या इकॉनोमीचा विचार करता वरुणची इकॉनोमी सर्वात कमी म्हणजे 6.40, त्यानंतर सुनीलची 6.44 आणि अखेर शाकिबची इकॉनोमी 6.64 इतकी आहे. दरम्यान टी20 प्रकारात 7 पेक्षा कमी इकॉनोमी म्हणजे उत्कृष्ट असल्याने सीएसकेची डोकेदुखी वाढली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.