T20 World Cup : सर्व देश नव्या रंगात, नव्या जर्सीत

पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपची सर्वच संघासह फॅन्सही आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल 5 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर या भव्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या भव्यदिव्य स्पर्धेत सर्वच संघ हे नव्या अवतारात दिसणार आहेत. सर्व संघानी आपल्या जर्सीचे सोशल मीडियाद्वारे अनावरण केले आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमताच पात्र झालेल्या नाम्बिया संघाची जर्सीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गडद निळ्या रंगासह काळ्या रंगाची ही जर्सी अतिशय आकर्षक दिसत आहे.

सर्वाधिक चर्चा असलेल्या भारतीय संघाने देखील नुकतीच आपली जर्सी सर्वांसमोर आणली. ही जर्सी एमपीएल स्पोर्ट्सने लॉन्च केली असून तेच यंदा भारतीय संघाचे अधिकृत किट स्पॉन्सर आहेत. बीसीसीआयने याबद्दलची माहिती देताना लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “या जर्सीचे रंग हे करोडो भारतीय फॅन्स जे संघाला चिअर करतात. त्यांना पाहून तयार करण्यात आली आहे.”

या जर्सीला ‘बिलियन चियर्स जर्सी’ असंच नावही दिलं आहे. सध्या भारतीय संघ घालत असलेल्या गडद निळ्या रंगासारखीच या जर्सीचा रंगही गडद आहे. पूर्वी भारत आकाशी कलरच्याच जर्सीस घालत पण अलीकडे गडद रंगाच्या जर्सी घालू लागला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने अजूनपर्यंत अधिकृतरित्या त्यांची जर्सी लॉन्च केलेली नाही. पण संघाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या एका व्हिडीओमध्ये त्याला ही जर्सी घातलेलं पाहिलं गेलं आहे. पिवळ्या आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असणारी ही जर्सी नेमकी कशी आहे. याची सर्वजण वाट पाहत आहेत.

दक्षिण आफ्रीका संघाने देखील टी20 वर्ल्ड कपसाठी दोन जर्सीस लॉन्च केल्या आहेत. यातील एक जर्सी हिरव्या रंगाची आहे तर एक पिवळ्या रंगाची आहे. यातील हिरव्या जर्सीला आदिवासी प्रकारची प्रिंट देण्यात आली आहे.

श्रीलंका संघानेही दोन जर्सीस सर्वांसमोर आणल्या आहेत. एक जर्सी निळ्या रंगाची असून त्याचे हात पिवळ्या रंगाचे आहेत. तर दुसरी जर्सी पहिलीपेक्षा थो़डी फिकट निळ्या रंगाची असून त्यावर सफेद रंगाच्या छटा देण्यात आल्या आहेत. दोन्हीवर एका बाजूला सिंहाची प्रिंट आहे.

बांग्लादेश संघाने देखील या स्पर्धेसाठी आपली नवीकोरी जर्सी लॉन्च केली. दोन जर्सीसमधील एक जर्सी हिरव्या रंगाची असून दुसरी लाल रंगाची आहे.

आयर्लंड संघानेही त्यांची विश्वचषकासाठीची जर्सी सर्वांसमोर आणली आहे. त्यांनी यंदा जर्सीत काळा रंग अधिक वापरला आहे. तर कॉलर, हात यांना हिरवा रंग दिला आहे. स्कॉटलँड संघाची जर्सीही अगदी आकर्षक असून त्यांनी काळ्या रंगाच्या जर्सीमध्ये वांगी रंगाचं कॉम्बीनेशन टाकत जर्सी तयार केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.