पुणे – इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया अर्थात “आयसीएसआय’तर्फे घेण्यात आलेल्या सीएस फाउंडेशन परीक्षेत 70.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दि. 26 व 27 डिसेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली. हा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.
बेंगळुरू येथील बालाजी बी. जी. या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. जबलपूर येथील प्रिया जैन व मुंबईतील भाईंदर येथील अपर्णा अगरवाल यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावला.
भुवनेश्वर येथील निकिता जैन व कोलकाता येथील चिराग अगरवाल यांनी संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकावला. सीए फाउंडेशनची पुढील परीक्षा 5 व 6 जून 2021 रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल www.icsi.edu या संकेतस्थळावर पाहता येईल तसेच डाउनलोडही करता येणार आहे.