devendra fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी भाजपवाले पळून गेले होते असा आरोप केला होता.
तर ठाकरे गटाकडून शिवसेना आणि भाजपा २०१९ साली वेगळे झाल्यानंतर बाबरी पाडण्यात आमचाच हात होता, यावरून श्रेयवाद दिसून आला. अशात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांवर आरोप करताना दिसले. फडणवीस यांच्या वजनानेच बाबरी पडली असावी किंवा बाबरी पडली तेव्हा ते शाळेत होते, असे आरोप उबाठा गटाकडून सातत्याने करण्यात येत होते.
त्यांच्या या आरोपावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत उत्तर दिले आहे. जुनी आठवण… नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे. पुरानी याद… नागपुर सें प्रकाशित होनेवाले ‘दै. नवभारत’ ने यह छायाचित्र मुझे भेजा है. जब नागपुर रेल्वे स्टेशन पर अयोध्या जानेवाले कारसेवकों की भीड उमडी थी, तब का यह छायाचित्र है. फोटोग्राफर शंकर महाकालकर इन्होंने यह फोटो निकाली है. कल, 22 जनवरी कों जब अयोध्या में प्रभूश्रीरामचंद्र जी की प्राणप्रतिष्ठा हो रही है, तो इस फोटो के माध्यम सें कई पुरानी यादें ताजा हो गई. नवभारत परिवार का मैं हृदयपूर्वक आभारी हूँ.’ असं लिहत त्यांनी आज सकाळी आपल्या एक्स अकाऊंटवर एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो कारसेवा करतानाचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.