सातारा – जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून परराज्यातून साताऱ्यात आलेल्या आणि 309, करंजे पेठ येथे वास्तव्यास असलेल्या अमोल आनंदराव गुजर याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल गुजर हा दि. 2 मे रोजी केरळमधून साताऱ्यात विनापरवाना आला असून तो करंजे पेठ येथे वास्तव्यास असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे हवालदार विश्वनाथ मेचकर यांना मिळाली. त्यानंतर मेचकर यांच्या फिर्यादीवरून गुजर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.