#crime news | कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना कोठडी

लोणी काळभोर  -भिशी व मुदत ठेवीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक करणाऱ्या तिघांना न्यायदंडाधिकारी यांनी सोमवार (दि. 28) जूनपर्यंत सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी फसवणुक करुन 9 महिन्यांपासून फरार असणारे भरतकुमार चरणदास जोशी (वय 63) व त्यांची मुले दीपक भरतकुमार जोशी (वय 36),

हिरेन भरतकुमार जोशी (वय 34, तिघेही रा. शिर्के हॉस्पिटल जवळ, ऊरूळी कांचन मूळ रा. सहयोग नगर, भुज, कच्छ, गुजरात) यांना पाकिस्तान सीमारेषा भुज, कच्छ (गुजरात) येथून जेरबंद केले आहे.

वरील तिघांनी फिर्यादी व इतर एकूण 11 जणांना 7 वर्षाच्या कालावधीत मुदतीवर, आकर्षक रक्कम परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्‍वास संपादन करुन आर्थिक फसवणुक केली.

तसेच काही लोकांची लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे धनादेशद्‌वारे व रोखीने घेवुन त्यांना परत न देता त्यांनी सन 2013 ते सन 2019 या कालावधीमध्ये एकूण 3 कोटी 59 लाख 96 हजार 130 रुपयांची फसवणुक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.

परंतु भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली यांनी उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक जणांना सुमारे दोनशे कोटींहून अधिकची माया जमा केली असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे ज्या नागरिकांची वरील पद्धतीने फसवणुक झाली आहे. त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे संपर्क साधावा असे अवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.