नागपूर हत्याकांड : हत्येचा घटनाक्रम रेकॉर्ड; सासू खोलीत आल्यावर म्हणाला बघा ना मरत पण नाही!

नागपूर – शहरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचा धक्कादायक काल घडला होता. या हत्येनंतर आरोपीने सुद्धा आत्महत्या केली होती. यामध्ये पत्नी, मुलगी, मुलगा, सासू व मेव्हणीची हत्या करण्यात आली होती.  दरम्यान या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अलोक माथुरकर असे आरोपीचे नाव असून हा प्रकार शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. अलोकने पत्नी अमिषा, मुलगी, मुलगा, सासू व मेव्हणीची हत्या केली व स्वत: आत्महत्या केली होती.

अमिषाने अलोकविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यामुळे त्यांच्यात वाद झाले होते. ‘तू मेरी नही तो किसी और की भी नही’ असे म्हणत तिला संपविण्याचा अलोकने निर्णय घेतला होता. हा वाद विकोपाला जाऊन अलोकने अमिषाचा गळा दाबला यामध्ये अमिषाची जीभ बाहेर आली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. अलोक अमिषाच्या मरणाची वाट बघत होता. तेवढ्यात अमिषाची आई या दोघांच्या खोलीत आली त्यावेळी अलोकने सासूला म्हणाला बघा ना मरत पण नाही… अन् नंतर त्याने चाकूने अमिषाचा गळा चिरला…

नागपूर पोलिसांना अमिषाचा मोबाईल सापडला असून त्यातील ऑडिओ क्लीपवरून आलोक घरी आल्यापासून दोघींच्या हत्येचा घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे. २७ मिनिटांची ही क्लीप आहे. यामध्ये तू माझी पोलिसांकडे तक्रार का केली…? अशी प्रथम अलोकने विचारना केली तेव्हा अमिषाने मी माझ्या मनाची मालकीण आहे. तू आपले काम कर असे उत्तर दिले. त्यानंतर अलोकने तू चांगली वाग.असे अमिषाला म्हणाला त्यावर तू चांगला वाग, अन्यथा पुन्हा तुझी तक्रार करेन असे अमिषा आपल्या उत्तरात म्हणाली. अमिषाच्या या उत्तराने अलोकला राग अनावर झाला आणि त्यातून त्याने हे कृत्य केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.