crime news | मास्टरमाइंड नट्या गावडे याच्यासह तिघे जेरबंद

टाकळी हाजी खूनप्रकरण, शिरूर पोलिसांची कारवाई

शिरूर  -टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे 18 जानेवारी रोजी भरदिवसा स्वप्निल रणसिंग या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. 

यातील मास्टरमाइंड नट्या ऊर्फ नितीन गिताराम गावडे व त्याच्या दोन साथीदारांना शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या पथकाने जेरबंद केले आहे.

नितीन ऊर्फ नट्या सीताराम गावडे (वय 30, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर), मोहन ऊर्फ पिंटु भाऊ चोरे (वय 33, रा. डोंगरगण, ता. शिरूर), सुनील अशोक सुंटले (वय 36, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. टाकळी हाजी येथे भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी सर्कल 

ऑफिसजवळ स्वप्नील रामसिंग याची दोघा जणांनी आठ गोळ्या घालून हत्या केली होती. यामुळे शिरूर तालुक्‍यात खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे तपास करीत आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.