मुंबई – बॉलिवूडमध्येही आपल्या आवाजाची जादू दाखवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका ‘वैशाली माडे’ हिने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वैशाली माडे यांची जयंत पाटील यांच्या निर्देशांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच यावेळी वैशालीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या.
यापूर्वी देखील अनेक मराठी कलाकारांनी आपल्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा घेतला आहे. वैशाली माडे ही शेतकरी कुटुंबातून आली आहे. हिंदी, मराठी चित्रपटांसह तिने अनेक मराठी मालिकांची ‘टायटल साँग’ देखील गायली आहेत. ‘भारतरत्न’ लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती जबरदस्त फॅन आहे. मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आली होती.
View this post on Instagram
‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटातील ‘पिंगा’ हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. अलीकडेच तिनं ‘कलंक’ चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया..’ हे गाणं गायलंय आहे. महाराष्ट्रासह देशभरात वैशालीचे असंख्य फॅन्स आहेत.