खडकवासला – हवेली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आयपीएस अनमोल मित्तल यांनी सांगितले की काल दि. ५ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास श्रेयश हॉस्पिटल किरकटवाडी येथून हवेली पोलीस स्टेशनला फोन करून एमएलसी कळवली की केदार दिलीप हगवणे वय (३२ वर्षे ) रा. नांदोशी रोड बापूजी बुवा नगर किरकटवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे, चैतन्य शिवाजी सावळे ( वय २६) रा.बी २०८ कमल ग्रीन लिस्ट सोसायटी क्रिकेटवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी दुपारी ४:३० वाजता श्रेयस हॉस्पिटल किरकटवाडी येथे ऍडमिट केले आहे.
हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्काळ दोन पोलीस पथके तयार करून एक पथक श्रेयस हॉस्पिटल किरकटवाडी येथे जखमींच्या जबाब नोंदवले कामी रवाना केले आहे व दुसरे पथक घटनास्थळी रवाना केले हॉस्पिटलमध्ये गेलेल्या पथकाने जखमींकडे तपास करून केदार दिलीप हगवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हवेली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
तसेच घटनास्थळी गेलेल्या पोलीस पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून त्या आधारे आरोपीची ओळख पटवून सदर गुन्ह्यातील आरोपी रवी मधुकर जाधव (वय २६ ) राहणार सागर संकुल सोसायटी फ्लॅट नंबर ६ रायकर मळा धायरी पुणे, अभिषेक विष्णू पवार (वय २१) वर्ष राहणार ऋतुजा प्रेसिडेन्सी फ्लॅट नंबर ३ गोकुळ नगर धायरी , गणेश तुळशीराम पवार ( वय २०) वर्ष राहणार नांदेड गाव लेबर कॅम्प तालुका हवेली जिल्हा पुणे,
आदेश तानाजी कडू (वय २१) राहणार महादेव नगर सर्वे नंबर ३० नांदेड फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे यांना अवघ्या चार तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत तपास करून त्यांना सदर गुन्हा चे तपासणी प्रकरणी अटक करण्यात आले असून त्यांची आज रोजी न्यायालयातून पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करून घेतले आहे. सदर गुन्ह्यामध्ये दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडे तपास करून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
उर्वरित अनोळखी सहा ते सात जणांचा शोध सुरू आहे. यातील आरोपी यांच्याविरुद्ध यापूर्वी सिंहगड पोलीस स्टेशन व हवेली पोलीस स्टेशन येथे खूनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर गर्दी जमवून मारामारी करून दहशत पसरवणे, बेकायदेशीर रित्या धारदार शस्त्र जवळ बाळगणे इत्यादी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड पडताळून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अन्वये कारवाई करण्याची काम सुरू आहे.
तसेच यापुढे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपी विरोधात मोका व इतर प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कठोर कारवाई करणार आहोत. वरील कारवाई पोलीस अधीक्षक पुणे अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे , हवेली विभाग पुणे भाऊसाहेब ढोले पाटील , अनमोल मित्तल, परिविक्षाधीन भा.पो.से. तथा प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस स्टेशन यांनी केली असून सदर कारवाई मध्ये पोलीस उपनिरीक्षक, ऋतुजा मोहिते पाटील, पोलीस हवालदार दिनेश कोळेकर, निलेश राणे, विजयकुमार कांबळे, पोलीस नाईक, दीपक गायकवाड, राजेंद्र मुंडे ,गणेश धनवे, संतोष भापकर, रणजीत खंडाळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार रामदास बाबर यांचा सहभाग होता.