बारामती – लोखंडी कोयत्याने मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पिंटू बाळू देवकाते (रा. काटेवाडी, ता. बारामती) याच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश सुदाम राखपसरे यांनी याबाबत फिर्याद दिली. (दि.2) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
देवकाते यांनी त्यांच्या घराच्या पूजेच्या कार्यक्रमाला येण्याच्या कारणावरून फिर्यादीचा मामेभाऊ अजय लोंढे यास जातीवाचक अपमानास्पद भाषा वापरत शिवीगाळ केली. पाठीमागून येत लोखंडी कोयत्याने फिर्यादीला डोक्यामध्ये, कानाच्या मागे वार करीत दुखापत केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे तपास करीत आहेत.