David Warner On Retirement – एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा संपल्यावर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हीड वॉर्नर निवृत्त होणार असे वृत्त पसरले होते. खुद्द वॉर्नरने याचा खुलासा करताना इतक्यात निवृत्तीचा विचार नसल्याचे म्हटले आहे.
भारताविरुद्धच्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम लढतीनंतर वॉर्नर मायदेशी परतला. त्याने भारतातच होत असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे तो आता निवृत्त होणार असे बोलले जात होते.
वॉर्नर याबाबत म्हणाला की, या वृत्तात तथ्य नाही. मी अद्याप खेळाचा आनंद घेत आहे. ज्या दिवशी माझी कामगिरी सुमार होइल त्यावेळी कारकीर्दीबात विचार करीन. मात्र, आगामी काळात होत असलेल्या महत्वाच्या मालिकांपूर्वी विश्रांती देखील महत्वाची होती.
#CWC2023 #INDvAUS Final : कर्णधार रोहितच्या बाद होण्यावर गावसकरांचे मत, म्हणाले “तो फटका…”
दरम्यान, वॉर्नरने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 11 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 48.64 च्या सरासरीने आणि 108.30 च्या स्ट्राईक रेटने 535 धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 163 धावा होती, जी पाकिस्तानविरुद्ध बनवली होती.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या विजेतेपदाचा सामना सहा गडी राखून जिंकून त्याने विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. ट्रेव्हिस हेड हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ 50 षटकांत 240 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट गमावत 241 धावा करत सामना जिंकला.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द..
वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅट खेळतो. त्याने आतापर्यंत 109 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीच्या 199 डावांमध्ये 8487 धावा, एकदिवसीय सामन्याच्या 159 डावांमध्ये 6932 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 99 डावांमध्ये 2894 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 25 शतके, एकदिवसीय सामन्यात 22 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1 शतक झळकावले आहे.