पुणे – कारागिराने 35 लाख 80 हजाराचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात एका व्यवसायीकाने तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी मनोज इंद्रनील पन्ना (36,रा.कसबा पेठ) यांच्याकडे आरोपी मैदुल शेख (31,रा.पश्चिम बंगाल) हा कामाला होता.
फिर्यादीचा सोन्याच्या दागिण्यांना पॉलिश करुन देण्याचा व्यवसाय आहे. तर शेख हा त्यांच्याकडे दागिण्यांना पॉलिस करुन देण्याचे काम करतो. फिर्यादीने सराफांकडून तीन सराफांकडून 750 ग्रॅम सोन्याचे दागिने पॉलिस करण्यासाठी घेतले होते. हे दागिने शेखला पॉलिस करण्यासाठी दिले असता, त्याने दागिने घेऊन पळ काढला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.