पुणे – शारिरीक संबंध प्रस्थापित करुन तीन कोटीची जमिन नावावर करुन घेतल्यावर, उर्वरीत 58 गुंठे जमिन नावावर करुन घेण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एका महिला वकिलासह तीघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश शेलार(कोथरुड) ,नितीन हनमे अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी वकिल महिलेने फिर्यादीच्या पतीबरोबर जवळीक साधली होती. यानंतर त्यांच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित करुन त्यांना कंन्स्ट्रक्शनच्या व्यवसायासाठी 35 लाख रुपये दिले होते. त्या बदल्यात त्यांच्या पतीकडून मरकळ(ता.खेड) येथील तीन कोटी रुपयांची 42 गुंठे जमिन स्वत:च्या नावावर करुन घेतली होती.
उरलेली 58 कोटी रुपयांची जमिन नावावर करुन दे नाहीतर तुझ्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन, त्याला जेलमध्ये आयुष्यभर सडवेल अशी धमकी दिली. यानंतर निलेश व नितीन यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करुन 58 गुंठे जमिन नावावर करुन द्या नाहीतर तुझ्या नवऱ्याला आम्ही जिवंत सोडणार नाही असा दम भरला. दरम्यान आरोपी वकिल महिलेने फिर्यादी महिलेला तीचे व तीच्या पतीचे स्वत: बरोबरचे एकत्रीत असलेले फोटो पाठवून मानसिक त्रास दिला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक तटकरे तपास करत आहेत.