गौतम गंभीरच्या दुहेरी मतदान ओळखपत्र प्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली – दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव नोंदवून दोन्ही मतदार कार्ड मिळविल्याप्रकरणी, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी मार्लेना यांनी गौतम गंभीरच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. यावर तीस हजारी कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवत राज्य निवडणूक आयोगाकडून रेकॉर्ड संबंधित कागदपत्रे मागविली आहेत.

आम आदमी पक्षाच्या उमेदवार अतिषी यांनी गौतम गंभीरकडे राजेंद्र नगर आणि करोलबाग या दोन्ही ठिकाणची मतदान ओळखपत्रे असल्याचा आरोप केला होता. आणि यासंदर्भात तीस हजारी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी घेत न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात रेकॉर्ड मागितले आहेत. त्यानंतर १३ मे रोजी न्यायालय आपला फैसला जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.