महाळुंगे – महाळुंगे पोलिसांकडून मंगळवारी (दि.04) खराबवाडी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सातवी ते दहावीपर्यंतचे एकूण 300 विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करून, लहान मुलांमधील वाढती गुन्हेगारी, इंटरनेटचा चुकीचा वापर, शाळेमध्ये दुचाकीचा वापर, मुलींची छेडछाड, गुड टच बॅड टच, लैंगिक अत्याचार, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, मुख्याध्यापक बोराटे व त्यांचे सहकारी, कर्मचारी उपस्थित होते.