Coronavirus | पुणे विभागात अवघ्या 2 आठवड्यांत 1 लाख बाधित; पाहा संपूर्ण आकडेवारी

पुणे – गेल्या अवघ्या 14 दिवसांत पुणे विभागात तब्बल एक लाख नवे करोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण बाधित संख्येने सव्वाआठ लाखांचा टप्पा पार केला आहे. बाधित वाढण्याच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

पुणे विभागातील करोना बाधित संख्या 8 लाख 22 हजार 939 वर पोहचली आहे. त्यातील आतापर्यंत 7 लाख 11 हजार 203 बाधित करोनातून बरे झाले आहेत. सध्या विभागातील करोनामुक्तीचे प्रमाण 86.42 टक्के इतके आहे. दरम्यान, 94 हजार 14 बाधित सक्रीय असून, आतापर्यंत विभागामध्ये करोनामुळे 17 हजार 722 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.15 टक्के इतके आहे.

जिल्हानिहाय करोनाबाधित
पुणे : 5 लाख 82 हजार 904 बाधित संख्या आहे. त्यांपैकी 4 लाख 94 हजार 984 जण करोनामुक्‍त झाले आहेत. सक्रीय बाधित 77,730 आहेत. 10,190 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

सातारा : 68 हजार 668 बाधितांपैकी 61 हजार 476 जण करोनामुक्‍त झाले आहेत. 5 हजार 279 सक्रीय बाधित आहेत. 1,908 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर : 65 हजार 478 बाधितांपैकी 56 हजार 265 जण करोनामुक्‍त झाले आहेत. 7 हजार 194 सक्रीय बाधित आहेत. 2,019 जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली : 53 हजार 140 बाधितांपैकी 48 हजार 626 जण करोनामुक्‍त झाले आहेत. सक्रीय 2 हजार 697 तर आतापर्यंत 1,817 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर : 52 हजार 754 बाधितांपैकी 49 हजार 852 जण करोनामुक्‍त झाले आहेत. सध्या 1,114 बाधित उपचार घेत आहेत. 1,788 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.