#coronavaccine : पंतप्रधान मोदींनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस

मुंबई –  देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. दरम्यान, या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली होती. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला होता. तर आज करोना लसीचा दुसरा डोस  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  एम्स रुग्णालयात  घेतला आहे. यासंदर्भातील फोटो मोदींनीच ट्विट केला आहे.

याबाबत त्यांनी ट्विट केले आहे की,’मी आज एम्स रुग्णालयात करोना लसीचा दुसरा डोस घेतला. करोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे. जर तुम्ही करोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा”.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.