सीआयएसएफच्या आणखी 20 जवानांना करोनाबाधा

नवी दिल्ली -केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) आणखी 20 जवानांना करोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे सीआयएसएफमधील सक्रिय बाधितांची संख्या 78 झाली आहे. त्या दलातील 132 करोनाबाधित जवान आतापर्यंत पूर्ण बरे झाले आहेत. नव्या बाधितांमध्ये दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तुकडीतील जवानांचा समावेश आहे.

त्याशिवाय, हिमाचल प्रदेश आणि चंडीगढमध्ये तैनात असलेल्या प्रत्येकी एका जवानाला करोनाची लागण झाली. दिल्ली विमानतळावर तैनात असलेल्या तुकडीतील 25 जवानांना आतापर्यंत करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर रूग्णालयांत उपचार चालू आहेत.

करोना संसर्गामुळे आतापर्यंत सीआयएसएफच्या 3 जवानांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे निमलष्करी दल असणाऱ्या सीआयएसएफमध्ये 1.62 लाख जवान आणि अधिकारी कार्यरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.