वाघळवाडी -कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील करोनाबाधित ज्येष्ठाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 5) मध्यरात्री पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे बारामती तालुक्यात आता करोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील एका ज्येष्ठ व्यक्तीचा मंगळवारी (दि. 2) करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील 17 लोकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये गुरुवारी (दि. 4) त्याची पत्नी तर शुक्रवारी (दि. 5) त्याच्याच घरातील इतर दोन सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोऱ्हाळे येथील एकूण बधितांची संख्या 4वर गेली असून गावात आढळल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यूचा झाला आहे.
दरम्यान, खबरदाराचे उपाय म्हणून गाव 28 दिवसांसाठी बंद केले असून गावातील सर्व घरातील व्यक्तींच्या तपासण्या सुरू केल्या आहेत.