कोरोनाचे थैमान: पुणे शहरात दिवसभरात आढळले तब्बल ‘इतके’ पॉझिटिव्ह, तर मृत्यू…

पुणे – शहरात अद्यापही कोरोना विषाणूचे थैमान सुरूच आहे. दिवसागणित मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असून , पुणे शहरात रविवारी (दि. १८) नव्याने ६ हजार ४३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या आता ३ लाख ६७ हजार झाली असून, ४ हजार ७१२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिवसभरात ४ हजार ७१२ रुग्णांना डिस्चार्ज – 
शहरातील ४ हजार ७१२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ०४ हजार ४९२ झाली आहे.

दिवसभरात नवे ६ हजार ४३४ कोरोनाबाधित –
पुणे शहरात आज नव्याने ६ हजार ४३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ६७ हजार २३७ इतकी झाली आहे.

दिवसभरात २४ हजार ०७२ टेस्ट –
पुणे शहरात आज एकाच दिवसात २४ हजार ०७२ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १८ लाख ८० हजार ७३५ इतकी झाली आहे.

गंभीर कोरोनाबाधितांची संख्या १,२५० –
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ५६ हजार ६३६ रुग्णांपैकी १,२५० रुग्ण गंभीर तर ५,८७० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

नव्याने ५३ मृत्युंची नोंद – 
पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार १०९ इतकी झाली आहे.

  • उपचार सुरु : ५६,६३६
  • नवे रुग्ण : ६,४३४ (३,६७,२३७)
  • डिस्चार्ज : ४,७१२ (३,०४,४९२)
  • चाचण्या : २४,०७२ (१८,८०,७३५)
  • मृत्यू : ५३ (६,१०९)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.