लष्कराची हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक

पुणे मिलिटरी इंटेलिजन्सने दिली होती गुप्त माहिती

पुणे – पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली एका 35 वर्षीय व्यक्‍तीला दिल्ली येथून अटक केली आहे. मिलिटरी इंटेलिजन्सच्या पुणे युनिटतर्फे मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली व्यक्‍ती हरपाल सिंग हा पंजाबमधील तारण जिल्ह्यातील मेहंदीपूर येथील रहिवासी आहे. हा भाग सीमेलगत असल्याने भारतीय सैन्याच्या तैनातीबाबत बरीच माहिती त्याला माहिती आहे.

सैन्याशी निगडित गोपनीय माहिती तो विदेशातील गुप्तचर संस्थांना देत होता. भारतीय सैन्याची दिशाभूल करण्याकरिता हरपाल सिंग हा फार्म मशिनरी ऑपरेटर म्हणून काम करत होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडून भारतीय सैन्य, बीएसएफशी संबंधित गोपनीय माहिती असलेली कागदपत्रे आणि त्याने पाकिस्तानी हॅंडलरशी संपर्क साधण्यासाठी वापरलेले मोबाइल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. हवाला वाहिन्यांमार्फत संवेदनशील माहिती पोहचविण्यासाठी त्याला प्रचंड रक्‍कम दिली जात होती. 

स्पेशल सेलच्या माहितीनुसार, हरपालसिंगने वेगवेगळ्या डिजिटल वाहिन्यांद्वारे गुप्त/संवेदनशील माहिती पाकिस्तानमधील लाहोर येथील जसपाल नावाच्या पाकिस्तानातील हॅंडलरकडे पाठवली. पोलिसांनी जप्त केलेली गुप्त माहिती तो आपल्या हॅंडलरना पाठवणार होता. यापूर्वी त्याने आपल्या हॅंडलरला कित्येक व्हिडिओ आणि माहिती पाठविली होती आणि त्यासाठी त्याला मोठी रक्कमही मिळाली होती. हरपाल सिंग यांच्याविरूद्ध दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल आणि मिलिटरी इंटेलिजेंस, पुणे यांच्या पथकाने तांत्रिक आणि मनुष्यबळाच्या आधारे पाळत ठेवत संशयित हालचालीसंदर्भात माहिती गोळा केली होती. या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.