मुंबई – मागील काही दिवसांपासून देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात रुग्ण वाढ अधिक आहे. बॉलिवूडमध्येही करोनाने शिरकाव केला असून अनेक कलाकारांना करोनाची लागण होत आहे. मध्यंतरी अभिनेता रणबीर कपूरला लागण झाली होता. आता अभिनेता कार्तिक आर्यन यालाही करोनाची लागण झाली आहे. कार्तिक आर्यनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.
प्लसचे चिन्ह असलेला फोटो शेअर करत कार्तिकने लिहीले आहे की, पॉझिटिव्ह झालो, माझ्यासाठी प्रार्थना करा.’ त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. दोन दिवसापूर्वी कार्तिक अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत एका फॅशन शोमध्ये सहभागी झाला होता. या शो मध्ये कार्तिकने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला सूट घातला होता. कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने कार्तिकच्या चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आलेले आहे.
View this post on Instagram
कार्तिककडे सध्या भुलभुलैया २, दोस्ताना २ हे दोन मोठे चित्रपट आहेत. यात भुलभुलैयाच्या सेटवर त्याने तब्बू आणि कियारासोबत काम करतानाचे फोटो शेअर केले होते. तर दोस्ताना २ मध्ये जान्हवी कपूर ही कार्तिकची सहअभिनेत्री आहे.