मुंबई : कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविध देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.
Due to the health crisis and the development of the French and international situation, the Festival de Cannes will no longer be able to take place on the dates planned, from May 12 to 23. More info #Cannes2020 ? https://t.co/peLmfw0gQW pic.twitter.com/SVWPasvU23
— Festival de Cannes (@Festival_Cannes) March 19, 2020
मात्र जगातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल्सपैकी एक लोकप्रिय फेस्टिवल असलेला कान्स फिल्म फेस्टिवलला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. कोरोनामुळे हे फिल्म फेस्टिवल पुढे ढकलण्यात आलं आहे. ७३ वे कान्स फिल्म फेस्टिवल हे १२ मे ते २३ मे या काळात आयोजित करण्यात आलं होतं. पण जगभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे या फेस्टिवलची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
आयोजक आता या फ्रेंच रिवेरा फेस्टिवलला जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरूवातीला आयोजित करतील. कान्स फिल्म फेस्टिवलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून १९ मार्च रोजी याबाबत ट्वीट करण्यात आलं आहे. त्यात लिहिलं आहे की, हेल्थ क्रायसेस आणि फ्रान्स आणि जगभरात सुरू असलेल्या या परिस्थितीमुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.