मुंबई – बॉलीवूड डीवा ऐश्वर्या राय बच्चनने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर धमाकेदारपणे अवतरली आहे. तिचा न्यूड मेकअप ब्लॅक रफल, फ्लॉवर गाउनसह ऐश्वर्या पूर्णपणे ऑन पॉइंट दिसत आहे. दीपिका पदुकोणनंतर आता ऐश्वर्या राय बच्चन रेड कार्पेटवर अवतरली.
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सुरुवातीला ऐश्वर्या राय बच्चनने गुलाबी रंगाचा सूट घातला होता, ज्यामध्ये तिने मॅचिंग हील्स कॅरी केली होती. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चनने रेड कार्पेटसाठी ब्लॅक रफल फ्लॉवर गाउन परिधान करणे पसंत केले. यासोबत न्यूड मेकअपही केला होता. समोरून गाऊनवर प्लंज नेकलाइन दिसत होती.उजव्या हाताला बरीच रंगीबेरंगी फुलं दिसत होती. त्याच वेळी, गाऊनच्या डाव्या बाजूला संपूर्ण कळीमध्ये फुले दिसत होती.
ऐश्वर्या राय बच्चनने या गाऊनने तिचा लूक अगदी सिंपल ठेवला होता. सिम्पल लिपस्टिक आणि कमी मेकअपमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने पापाराझींना भरपूर पोज दिल्या. रेड कार्पेटवरील ऐश्वर्या राय बच्चनचा हसरा लुक चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आला. मात्र तिच्या या लूकवरून काहींनी तिला ट्रोल केले आहे. युजर्सना तिचा मेकअप आवडला नाही. एका युजर्सने म्हटले की, आता ‘ऐश्वर्याकडे पूर्वीसारखे सौंदर्य राहिलेले नाही.’
यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन पिंक सूटमध्ये दिसली होती. मोकळे केस, न्यूड मेकअप आणि गुलाबी हाय हिल्समध्ये ऐश्वर्या राय बच्चन खूपच सुंदर दिसत होती. ती गुलाबी पँट सूटसोबत मॅचिंग लाँग बेल्टमध्ये दिसली. कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ऐश्वर्या राय बच्चन एका शैम्पू ब्रँडच्या व्यवस्थापक इवा लॉन्गोरियासोबत दिसली.