नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर तिसरी लाट टाळण्यासाठी सरकार युद्धस्तरावर काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून देशात करोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्याप अनेकजण करोना लस घेण्यासाठी इच्छूक दिसत नाही. अनेकांच्या मनात लशीबाबत भीती आहे. लसीच्या दुष्परिणामाची भीती दूर करण्यासाठी भाजपच्या एका आमदाराने अजब विधान केलं आहे.
मध्य प्रदेशातील कटनीच्या विजयराघवगडचे भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री संजय पाठक स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात म्हणाले की, ‘अनेक मूर्ख लोक अफवा पसरवत आहेत की करोना लस नपुंसकत्व आणेल, पण असे काहीही घडत नाही. मी देखील लस घेतली. त्यानंतर मी पण टेन्शनमध्ये होतो. मात्र 3-4 महिन्यानंतर स्वत: ची तपासणी केली असता काहीचं झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं.
ये है भाजपा के पूर्व मंत्री संजय पाठक जी…?
ये वैक्सीन लगवाकर टेंशन में आ गये थे , फिर इनका टेंशन तीन- चार माह बाद दूर हुआ…? pic.twitter.com/ZcJba0hLty— Narendra Saluja (@NarendraSaluja) August 17, 2021
एवढं बोलल्यानंतर आमदार पाठक यांनी उपस्थितांनी लस घेण्याचं आवाहन केलं. लसीच्या दुष्परिणामाचं टेन्शन घेऊ नका. काहीही झालं तरी लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वजण सुरक्षीत होऊ शकतं, असंही पाठक यांनी नमूद केलं.