नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाच्या 41 हजार 506 नवीन केसेस आढळून आल्या आहेत, तर करोनामुळे गेल्या 24 तासांत 895 करोना रुग्ण दगावले आहेत.
त्यामुळे देशात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 4 लाख 70 हजाराच्या पुढे गेली आहे. दरम्यान, देशातील करोनाच्या ऍक्टिव्ह केसेसची संख्या 4 लाख 54 हजारावर आली आहे.
देशातील ऍक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण 1.47 टक्क्यांवर आले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात करोनाचे 41 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
देशातील रिकव्हरीचा रेट 97.20 टक्क्यांवर गेला आहे. गेले सलग 20 दिवस दैनंदिन पॉझिटिव्हिटीचा रेट 3 टक्क्यांच्या खाली राहिला आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटीचा रेट 2.25 टक्के इतका आहे.