फलटण तालुका हॉटस्पॉट
सातारा – जिल्ह्यात दिवसभर 141 जणांचे अहवाल करोनाबाधित आढळून आले. तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एका बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये सांघवी, ता. खंडाळा येथील 70 वर्षीय महिला या एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने – 373111
एकूण बाधित – 61027
घरी सोडण्यात आलेले – 57352
मृत्यू – 1874
उपचारार्थ रुग्ण – 1801