आंबेठाण -महाळुंगे इंगळे औद्योगिक परिसरामध्ये कंपनीत एक करोना संशयित आढळल्याने खळबळ उडाली होती; परंतु त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी भयमुक्त झाल्याची भावना व्यक्त केली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही कंपनी पुढील काही काळासाठी सील केली आहे व 40 कामगारांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
तसेच सर्व कंपन्यांनी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून कारखाने सुरू करायचे आहेत. करोनाचा धोका अजून टळलेला नाही. खबरदारीचे सर्वतोपरी उपाय करूनच उद्योगांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्याची इथून पुढील काळात सुद्धा काटेकोरपणे पालन केले जावे, असे आव्हान यानिमित्ताने प्रशासनाने केले आहे.