सुपे गावातील व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

सासवड (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्यातील सुपे येथील एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असुन सदर रूग्ण सिरम कंपनीत नोकरीत आहे. सिरम कंपनी मधील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीमधील लोकांची कोरोना तपासणी केली. त्या तपासणीमध्ये काही लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पुरंदर तालुक्यातील सुपे गावातील एक व्यक्ती आहे. सदर व्यक्ती काल कंपनीमध्ये गेली असता , कंपनी ने त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले आहे.

प्रशासनामार्फत पुढील कारवाई करण्यात येत आहे.

पुरंदर तालुक्यातील सर्व जनतेला पुन्हा एकदा कळकळीचे आवाहन करण्यात येते की, बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींनी  स्वतःला कॉरंटाईन करावे व सहकार्य करावे. कुटुंबाने त्यांच्या संपर्कात येऊ नये. तसेच दरोराज पुणे येथे जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील लोकांनी कार्यालय व घर या शिवाय गावात इतरत्र फिरू नये.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×