दौंड- दौंड तालुक्यातील नागरिकांची करोना तपासणी तालुक्यातच होणार असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. दौंड तालुक्यात सुरवातीचे 51 दिवस कोणताही करोना बाधीत रुग्ण आढळला नाही.
मात्र सध्या तालुक्यात दहिटणे येथे 1 व राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 येथे 8 रुग्ण करोना बाधीत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार कुल यांनी स्थानिक विकास निधीतून शासनमान्य करोना चाचणीचे किट खरेदी केले, असुन ते दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाले आहेत.
या किटच्या माध्यमातून सात नागरिकांचे तपासणीचे नमुने घेऊन ते पुणे येथे पाठविले आहेत. तालुक्यातील करोनाबाबत उपाययोजना म्हणून कोविड सेंटर व डेडिकेटेड कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.