पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 8) करोनाने एका 76 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. दौंड-सिंधी गल्ली येथील ही वृद्धा आहे. त्यामुळे रुग्णालयात आत्तापर्यंत मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्या 13 पर्यंत पोहचली आहे.
दरम्यान, करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज आणखी सहा करोना बाधित रुग्णांची भर पडली. नव्याने वाढलेल्या करोना बाधित रुग्णांमध्ये 4 महिला आणि 2 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातही दोन रुग्ण ज्येष्ठ आहेत. दौंड, दापोडी, थेरगाव, सांगवी, शिवाजीनगर, बोपोडी येथील हे रुग्ण आहेत.
रुग्णालयात सध्या 31 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 8 करोना संशयित रुग्णांना आज उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे.