दिलासादायक! कोरोनाची दुसरी लाट लवकरच ‘ओसरणार’; संशोधनात सिद्ध झालं

पुणे – देशात करोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. दररोज 2 लाखाहून अधिक नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. तर 1 हजाराहून अधिक जणांचा करोनाने मृत्यू होत आहे. अशा या भयंकर परिस्थितीत credit suisse च्या संशोधनातून दिलासादायक माहिती समोर आलीय.

जितक्या वेगाने करोनाची दुसरी लाट पसरली आहे, तितक्याच वेगाने ती ओसरणार असल्याची माहिती credit suisse च्या संशोधनातून समोर आली आहे.

संशोधनानुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस भारतीय लोकसंख्येतील 40 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज निर्माण झालेल्या असतील. गेल्या वर्षी डिसेंबर महिना अखेरीस देशातील 21 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या होत्या. एप्रिल अखेरीस हे प्रमाण वाढत जाऊन यामध्ये आणखी 7 टक्क्यांची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशात सुरु असणाऱ्या लसीकरण मोहिमेमुळे आतापर्यंत जवळपास 12 टक्के जनतेमध्ये कोरोनाशी लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती विकसीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे देशातील 40 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या धोक्यापासून दूर असेल, अशी माहिती सदर संशोधात स्पष्ट करण्यात आली आहे.

डबल म्युटेशनमुळे वाढतेय कोरोना रुग्णसंख्या?

नवीन वाढत्या रुग्णवाढीवरून आणि वाढत्या मृत्यूवरून दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचे दिसते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागे डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना असल्याचा दावा आता करण्यात येतोय. गेल्या आठवड्यात भारतीय वैज्ञानिकांनी जीनोम सिक्वेन्सिंगचा एक डेटा जमा केला होता. त्यामध्ये 24 टक्के नव्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या डबल म्युटेशनचा स्ट्रेन सापडला असल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रात देण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.