नवी दिल्ली – मागील अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांना तोंड देत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना जामीन अखेर झारखंड उच्च न्यायालयाने जामीन दिला. चारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव शिक्ष भोगत आहेत. या व्यतिरिक्त दिल्ली उच्च न्यायालयाने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आणि लाल किल्ला येथे झालेल्या हिंसेप्रकरणी अटकेत असलेल्या दीप सिद्धू याला जामीन दिला आहे.
चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांच्या विरोधात वेगवेगळे खटले दाखल झाले आहेत. यातील एका प्रकरणात त्यांना शिक्षा झाली तर अन्य एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना तब्येत खालावल्यामुळे ते काही काळ हॉस्पिटलमध्ये होते. जामीन मिळाल्यामुळे लालू यादव घरी परतणार आहेत. झारखंड उच्च न्यायालयाकडून लालूंना जामीन मिळाल्याचे कळताच यादव कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. न्यायालयाकडून लालूंना न्याय मिळेल, असा विश्वास तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला.
We were confident that we’ll get justice. Lalu ji has served half of his sentence, High Court granted him bail on that ground. We thank High Court. He’s admitted at AIIMS. We are happy he got bail but we are worried about his health: Tejashwi Yadav, Lalu Yadav’s son & RJD leader pic.twitter.com/HDRGeWedcE
— ANI (@ANI) April 17, 2021
लालू यादव एकेकाळी राजकारणातील चर्चित चेहरा होते. देशाचे रेल्वेमंत्री तसेच दीर्घकाळ बिहारचे मुख्यमंत्री होते. जामिनावर असतानाच्या काळात लालूंना परदेशी जाण्यास मनाई आहे. त्यांना राहण्याची जागा आणि कोर्टासमोर जाहीर केलेला संपर्क क्रमांक हे दोन्ही बदलण्यास मनाई आहे.