बेंगळूरु :– प्रो-कबड्डी लीगमधील काही संघातील खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आयोजकांना या स्पर्धेच्या वेळापत्रकात मोठे बदल करावे लागले आहेत. बाधित खेळाडू कोण तसेच ते कोणत्या संघाचे आहेत याबाबत आयोजकांनी कोणतीही माहिती दिलेली नाही मात्र, त्यामुळे स्पर्धेतील काही सामने पुढे ढकलले आहेत.
या लीगच्या बायोबबलमध्ये करोनाची एन्ट्री झाल्यामुळे आता काही नवे नियमही लावले जाणार आहेत. या स्पर्धेत पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन संघांमधील काही खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
त्यामुळे या संघांना सामन्यासाठी 12 तंदुरुस्त खेळाडू उपलब्ध करणे कठीण झाले त्यामुळे पुढील कालावधीतील काही सामन्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. करोनाबाधित खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे आयोजक मशाल स्पोर्टसने सांगितले आहे.