गाझियाबाद – हरिद्वार येथील वादग्रस्त धर्म संसदेचे संयोजक यती नरसिंहानंद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.
त्यांच्यावर कलम 295 (ए) आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची रवानगी रोशनाबाद कारागृहात करण्यात आली आहे, अशी माहिती हरिद्वार पोलीस स्टेशनचे एसएचओ रकिंदर सिंग कथैत यांनी दिली.
गाझियाबादमधील डासना मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद यांना शनिवारी रात्री गंगेच्या सर्वानंद घाटातून ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले.