बीड – जातीवाचक शिवीगाळ आणि वाहनात पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या वाहन चालकास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी आज करुणा शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. तर चालकास एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली होती. ती याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.
दरम्यान, शर्मा यांच्या वाहनातून पिस्तूल जप्त करण्यात आले होते. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.