बावधन – पुणे महानगरपालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असा आत्मविश्वास व्यक्त करत, बावधन येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे महापालिकेची प्रतीमा असलेली वस्तू भेट दिली. त्यावेळी पवार यांनीही या भेटीचे कौतुक करत मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच जिल्हा उपाध्यक्ष अभिजित दगडे पाटील यांच्या वतीने ही भेट देण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक युवराज बेलदरे, महेश हांडे यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्तिथ होते.