वाघोली (प्रतिनिधी) – तत्कालीन लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक नियंत्रण समिती व भाजप नेते संपत गाडे यांच्याकडून वाघोलीमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी कौतुक केले.
वाघोली (ता. हवेली) येथील नागरिकांशी भेट घेऊन वाघोलीतील विविध समस्यांबाबत निकम यांनी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वाघोली ग्रामस्थांच्या वतीने भाजप नेते संपत गाडे यांच्या हस्ते पगडी, गाथा प्रत देऊन निकम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाघोली येथील तरुणांनी तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, कर्मचारी, ग्रामस्थांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबतची माहिती भाजप नेते गाडे यांनी निकम यांना दिली. वाघोलीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नाबद्दल वाहतूक नियंत्रण समितीचे संपत गाडे व मित्र परिवाराचे निकम यांनी कौतुक केले.
वाघोली : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला.