पुणे – भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ल्याप्रकरणी एकास सोमवारी अटक करण्यात आली. याप्रकरणात शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी गवते (वय ३२, रा. नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर आरोप केले आहे. ते म्हणाले,’ केंद्राची झेड सिक्युरिटी असताना हल्ला झाला. एका माणसावरआरोप झाले ते त्याला सहन होत नाही. मुंबई आमची, असे तसे आरोप आहेत. बाकीच्यांनी आरोपांवर कोर्टात जाण्याची भूमिका घेतली. तर त्यांना मॉब लिंचिंग करुन सोमय्यांची हत्या करण्याचा कट केला. केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या ईडीचा वापर करतात असं वाटत असेल तर कोर्टात जा. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांचावर आरोप केले आहे.
ते पुढे म्हणाले,’महाराष्ट्रात टोळीचं सरकार चाललंय का? सिताराम कुंठे यांनी आरोप केला, अनिल देशमुख चिठ्ठी पाठवायचे अनिल देशमुख म्हणतात अनिल परब यादी पाठवायचे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी ही इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला होता. तेम्हणाले होते की,’महाविकास आघाडी सरकार बळाचा वापर करून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आवाज दडपू पाहत आहे पण ही दडपशाही चालणार नाही. भाजपा पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांचा आवाज कोणालाही दडपता येणार नाही, असा इशारा पाटील यांनी राज्य सरकारला दिला होता.