नवी दिल्ली – कर्नाटकात सरकार स्थापन केल्यापासून सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आपल्या पाच हमीभाव पूर्ण करण्यात गुंतला आहे. नुकतेच सिद्धरामय्या सरकारने आपली शक्ती योजना सुरू केली. या योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने सीएम सिद्धरामय्या यांनी स्वतः कंडक्टर बनून महिला प्रवाशांना प्रवास करायला लावला होता.
अशात इतर भागातील काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांनीही या योजनेचा प्रचार करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्या रुपकला एम शशिधर यांनी स्वत: महिलांना मोफत बस पासचे वाटप केले. त्यांनी यावेळी बसही चालवली मात्र बस चालवतांना त्यांनी चुकून रिव्हर्स गेअर लावला, त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले. चुकून रिव्हर्स गेअर मारल्याने बस मागे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना धडकली. यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे.
कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. या योजनेअंतर्गत राज्यभरातील महिलांना मोफत बससेवेचा लाभ दिला जाणार आहे. यासोबतच कर्नाटक सरकारच्या बसेसमध्ये 20 किलोमीटरच्या आसपासच्या इतर राज्यांमध्येही हा लाभ दिला जाईल.
काँग्रेसने निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला पाच आश्वासने दिली होती, या आश्वासनांना पक्षाने पाच हमीभाव असे नाव दिले होते. या हमींमध्ये मोफत बससेवेशिवाय गृह ज्योती योजना, युवा निधी योजना, अन्न भाग्य योजना आणि गृहलक्ष्मी योजना यांचा समावेश आहे.