पुणे – पुण्यात कॉंग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाच्या हिताकडे सातत्याने दुर्लक्ष चालवलेले असून या पक्षाने मुस्लिमांसोबात सोशल डिस्टसिंग पाळले आहे असे वाटावे अशी सध्याची स्थिती असल्याचे भावना पुणे शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी व्यक्त केली आहे.
अमिनुद्दीन पेनवाले यांच्यानंतर पुण्यात मुस्लिमांना ना शहराध्यक्षपद मिळाले ना या समाजाला आमदारकी मिळाली, गेले अनेक दिवस ही स्थिती असून आता मुस्लिमांच्या प्रतिनिधींना पुण्यात न्याय मिळावा अशी मागणी आम्ही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे करणार आहोत असेही शेख यांनी म्हटले आहे.
पुण्यातील नेते मंडळींविषयी नाराजी व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की त्यांच्यापैकी कोणालाही मुस्लिमांना प्रतिनिधीत्व मिळावे असे वाटत नाही. जो तो स्वतासाठीच मागणी करताना दिसत आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. शहराध्यक्ष किंवा आमदारकी यापैकी एके ठिकाणी तरी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींची वर्णी लावावी मागणीही त्यांनी केली आहे.