नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दर कपातीचा निर्णय मोदी सरकारने घेतला त्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केंद्राचे आभार मानले आहेत.
ते म्हणाले की हे पंतप्रधान मोदींच्या जनतेप्रती असलेल्या आस्थांचा आणि त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी असलेल्या वचनबद्धतेचाच दाखला आहे.
कालच केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर 8 रूपयांनी तर डिझेल वरील उत्पादन शुल्क 6 रूपयांनी कमी केले आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक एक लाख कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले की आता राज्यांनी जागे होण्याची आणि त्यांच्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी व्हॅट कमी करण्याची वेळ आली आहे, राज्यांनी या संबंधात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.