kerala Election 2021 : गरीबांना मोफत घर, महिलांना दरमहा 2000 पेन्शन; वाचा काॅंग्रेसचा जाहीरनामा

थिरूवनंतपुरम, दि. 20 – केरळातील विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला. त्यात त्यांनी गरीबांना पाच लाख मोफत घरे, महिलांना दरमहा दोन हजार रूपयांची पेन्शन, अन्नधान्यांच्या मदतीचे आश्‍वासन दिले आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठीही यात अनेक आश्‍वासने देण्यात आली आहे.

महिला उमेदवारांना सरकारी नोकरीसाठीच्या प्रवेश परिक्षांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्याचेही आश्‍वासन यात देण्यात आले आहे. 40 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिन्याला दोन हजार रूपयांची मदत देण्याची ग्वाहीही यात देण्यात आली आहे.

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीतर्फे एकत्रितपणे हा निवडणूक जाहीरनामा प्रसारीत करण्यात आला आहे. केरळातील डाव्या आघाडीने या आधीच आपला निवडणूक जाहीरनामा प्रसारीत केला आहे. त्यातही अनेक आश्‍वासनांची खैरात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.